घरताज्या घडामोडीनगरपंचायत निवडणूक : मतदानाच्या आकडेवारीने उमेदवारांना धडकी

नगरपंचायत निवडणूक : मतदानाच्या आकडेवारीने उमेदवारांना धडकी

Subscribe

काही प्रभागात मतदानाची टक्केवारी वाढली, काही प्रभागात कमी झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली

नाशिक जिल्ह्यातल्या ६ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली. या सर्व नगरपंचायती मिळून १०२ प्रभागांतून ८७ जागांसाठी २९३ उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. १०५ मतदान केंद्रांवरुन तब्बल ५३ हजार ८९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निफाडच्या प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक ८४.१९ मतदान

निफाड – नगरपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७४.१२ टक्के मतदान झाले. काही प्रभागात मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि काही प्रभागात कमी झालेले मतदान यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

- Advertisement -

कळवणला प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक ८४.१९ मतदान

कळवण – नगरपंचायतीच्या चौदा प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १२ हजार ४०६ मतदारांपैकी ९ हजार १९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक ८४.१९ आणि त्याखालोखाल प्रभाग क्रमांक १७ मध्ये ८४ टक्के मतदान झाले.तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वात कमी म्हणजे ५९.९३ टक्के मतदान झाले.

निफाडला तिरंगी लढतीत उमेदवार उत्साही; मतदार निरुत्साही

नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ जागांपैकी १४ जागासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये एकूण १४०३० मतदारांपैकी १०३३२ मतदारानी मतदान करुन आपला लोकशाही प्रणालीतील पवित्र हक्क बजावला. यामध्ये ७३.६४ टक्के मतदान झाले. २७ मतदान बुथवर मतदान शांततेत पार पडले. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

- Advertisement -

देवळ्यात मतदान शांततेत; आता उत्सुकता निकालाची

नगरपंचायतीच्या ११ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत ७८.३4 टक्के मतदान झाले. येथील नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानासाठी मंगळवारी (दि.21) सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक असली तरी प्रारंभापासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. ११ प्रभागात कोणतेही गालबोट न लागता शांततेत मतदान झाले.

सुरगाण्यात राजघराण्यातील मतदारांनी बजावला हक्क

सुरगाणा नगरपंचायतीच्या १७ मतदान केंद्रांवर 75.50 टक्के मतदान शांततेत झाले. राजघराण्यातील मतदारांनी या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पेठमध्ये सर्वाधिक मतदानाने उमेदवारांना धडकी

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिध्द असलेल्या पेठ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक ८०.६३ टक्के मतदान झाल्याने उमेदवारांची झोप उडाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी मातब्बर नेत्यांच्या प्रचार फेरी आयोजित करुन विरोधकांना पराभूत करण्याची रणनिती आखली होती. ही रणनिती कामी येते की शिवसेनेची सत्तापालट होते, हे येत्या १५ जानेवारी रोजी निकालातून स्पष्ट होईल.

थंडीत मतदानाचा आकडा घटल्याने उमेदवारांचा पारा चढला

सुरगाणा नगरपंचायत निवडणूक अतिशय शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १२२४६ मतदारांपैकी ९७८४ (८०%) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने मतदार मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते सकाळपासून मतदार आणण्यासाठी धावपळ करत होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -