Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र ‘नमामि गोदा’ प्रकल्प अडकला, इको-सेन्सेटिव्ह झोन ठरतोय अडथळा

‘नमामि गोदा’ प्रकल्प अडकला, इको-सेन्सेटिव्ह झोन ठरतोय अडथळा

Subscribe

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना केवळ नदी स्वच्छता व सुशोभिकरण यावर भर दिल्याचे आतापर्यंत लक्षात आले. या प्रकल्पात नियमाप्रमाणे नदी काठावरील जैवविविधतेचाही विचार करणे आवश्यक असल्याने संबंधित सल्लागार संस्थेने महापालिकेकडून त्याबाबत माहिती मागवली आहे. त्यामुळे ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीची स्वच्छता तसेच सुशोभिकरण यासाठी ’नमामि ’गोदा’ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून प्रकल्पासाठी जवळपास १८०० कोटी रुपये देण्यात तत्वता मंजुरी दिली आहे. प्रकल्पात प्रामुख्याने नदी नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळवणे, अहमदाबादच्या साबरमती नदी प्रकल्पाच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणे, नदीची जैवविविधता जपणे, घाटांचे नूतनीकरण करणे, स्मशानभूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीचा प्रवाह वाहता व स्वच्छ ठेवणे, नदीकिनारी असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे आदी कामे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्त करण्यात आली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्यासाठी विलंब होत आहे. असे असताना आता इको सेन्सेटिव्ह झोनचा मुद्दा समोर येत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र व्यवहार करीत इको सेन्सेटिव्ह झोनची माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या माहितीच्या प्रकल्पाचा बेस मॅप तयार केला जाणार आहे.

नमामी गोदा प्रकल्प नेमका कसा..?

या प्रकल्पाद्वारे शहरातील गोदावरी नदीमध्ये येणारे नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत जाऊ न देता शहराबाहेर काढले जाणार आहे. यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखता येणार असून, गोदावरीचे पाणी शुद्ध होणार आहे. तसेच, गोदावरी नदीघाटांचे सुशोभीकरण, कारंजे, पुरातन मंदिरांचे जतन, लेझर शो याद्वारे गोदावरीचे सौंदर्य खुलवले जाणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -