देवळ्यात नाना पटोलेंचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त

देवळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देवळ्यात भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदधिकार्‍यांनी देवळा पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना निवेदन दिले.

नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक लांडगे यांना निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे संतापजनक वक्तव्य केले. खालच्या पातळीचे असून काँग्रेसच्या मानसिकतेचे दर्शन घडवत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान यांना मारण्याची व शिव्या देण्याची भाषा करत आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधानाच्या हत्येचा कट उधळला गेला असून नाना पटोलेंच्या अशा वक्तव्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार आहे.

देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर देवळ्यात रस्तरोखो करण्याचा इशारा दिला. पोलिसांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम न करता अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर त्वरीत गुन्हा दाखल केला पाहिजे. निवेदनावर तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, सोपान सोनवणे, हर्षद मोरे, दिशांत देवरे, विजय आहेर, सागर शिंदे, शेखर आहेर यांची स्वाक्षरी आहे.