घरमहाराष्ट्रनाशिकनांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीत २४ हजार क्युसेस विसर्ग

नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीत २४ हजार क्युसेस विसर्ग

Subscribe

दुष्काळग्रस्त मराठवाड्याची भागणार तहान

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने नांदूरमधमेश्वर धरणातून चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 24 हजार क्युसेस जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. विसर्गामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागणार आहे.

दोन दिवसात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत असल्याने दारणा धरणातून नऊ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीला पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहाटे सुरू असलेले 3153 क्यूसेस पाण्याच्या विसर्गात वाढ करत दुपारी 12 वाजता धरणाच्या वक्रकर पाच गेटमधून 24 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास या विसर्गात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जात आहे. या पावसाच्या हंगामात 2 टीएमसीहून अधिका पाण्याचा गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -