घरमहाराष्ट्रनाशिककुसुमाग्रज प्रतिष्ठान अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

कुसुमाग्रज प्रतिष्ठान अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

Subscribe

मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून स्वीकारला पदभार

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. कुसुमाग्रज स्मारकात झालेले वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक २०१४ मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष झाले. त्यांनी विश्वस्तपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव कामकाज करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी न्यायमूर्ती चपळगावकर यांच्यासह चार नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची रविवारी (ता.२८) कुसुमाग्रज स्मारकात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

सभेत अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निवडीवर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. कार्यवाह प्रा.मकरंद हिंगणे यांनी वार्षिक सभेत ही घोषणा केली. न्यायमूर्ती चपळगावकर हे २०२३ पर्यंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहणार आहेत. सूत्रे स्वीकारल्यानंतर ते म्हणाले, प्रतिष्ठानची कार्यकक्षा विस्तारण्याचा मानस आहे. साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील स्वातंत्र्य, समता, बंधुभाव वाढवण्यासाठी प्रतिष्ठानमार्फत प्रयत्न करणार आहे.

- Advertisement -

यावेळी विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, डॉ. यशवंत बर्वे, गुरुमित बग्गा, रमेश देशमुख, श्याम पाडेकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रकाश वाजे, किशोर पाठक, विश्वास ठाकूर, रंजना पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -