घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक बार असोसिएशन; नितीन ठाकरे यांची हॅट्रिक

नाशिक बार असोसिएशन; नितीन ठाकरे यांची हॅट्रिक

Subscribe

उपाध्यक्ष पदी वैभव शेटे तर सचिव पदी हेमंत गायकवाड यांची निवड

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारती, वकील संरक्षण कायद्यासह वकिलांसाठीच्या विविध सुविधांभोवती रंगलेल्या आणि वकिलांची शिखर संघटना असलेल्या नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. नितीन ठाकरे यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना १ हजार ३८८ मते मिळाली. तर अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. महेश आहेर यांना १ हजार २५४ व अॅड. अलका शेळके यांना अवधी २८ मते मिळाली.

ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड होताच समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नाशिक बार असोसिएशनच्या २०२२ ते २०२५ च्या कार्यकारिणीसाठीचीनिवडणूक शुक्रवारी शांततेत आणि उत्साहात पार पडली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातील विधी प्राधिकरणाच्या इमारतीच्या तळमजल्यावर ही मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.६) ४० उमेदवारांसाठी ३ हजार ४६३ वकिलांनी मतदान केले. दिवसभरात एकूण २ हजार ७३५ वकिलांनी हक्क बजावल्याने ७८.९५ टक्के मतदान झाले. नाशिक बार असोसिएशनची चार वर्षांनंतर निवडणूक होते. मागील कार्यकारिणीची मुदत २०२० मध्ये संपली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

- Advertisement -

विजयी उमेदवार

अध्यक्ष : नितीन ठाकरे
उपाध्यक्ष : वैभव शेटे
सचिव : हेमंत गायकवाड
सहसचिव : संजय गिते
सहसचिव : सोनल गायकर
खजिनदार : कमलेश पाळेकर
सदस्य : शिवाजी शेळके, प्रतीक शिंदे, महेश यादव, अश्विनी गवते, वैभव घुमरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -