घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक बाजार समितीचे 178 गाळे काढण्याचे आदेश

नाशिक बाजार समितीचे 178 गाळे काढण्याचे आदेश

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील नामांकित बाजार समित्यांपैकी एक असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने अनधिकृतरित्या बांधलेल्या 178 गाळेधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांना अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी शनिवार (दि.23) पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे गाळेधारकांचे धाबे दणाणले असून, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे.

बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह माजी संचालकांनी शरदचंद्र पवार बाजार समितीच्या आवारात अनाधिकृत गाळे बांधले आहेत. अशा 178 अनाधिकृत गाळेधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच माजी सभापती देविदास पिंगळे व संपतराव सकाळे यांनी हे अनाधिकृत गाळे बांधले. त्यासाठी महापालिकेची कोणतिही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे देविदास पिंगळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दिनकर पाटील यांनी बाजार समितीचे प्रशासक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच गाळे धारकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई द्यावी. आपण पत्राप्रमाणे कार्यवाही केली नाही तर लोकशाही मार्गाने जनआंदोलन करेन आणि न्यायालयात दावा करण्याचा इशाराही दिला आहे. अनाधिकृत, बेकायदेशीर बांधलेल्या गाळेधारकांशी आमचे भांडण नसून चुकीचे बेकायदेशीर काम करणारे देविदास पिंगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या चुकीच्या कामास आमचा विरोध असल्याचे पाटील यांनी आपल्या पत्रात शेवटी म्हटले आहे.

- Advertisement -

 

माजी सभापती देविदास पिंगळेंच्या काळात सर्वाधिक बांधकाम

शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये 178 गाळ्यांचे बांधकाम कुठल्या सभापतींच्या काळात झाले, याविषयी बाजार समितीने दिनकर पाटील यांना माहिती दिली आहे. त्यानुसार माजी सभापती संपतराव सकाळे यांच्या काळत फ्रुट विभागात 19 गाळे बांधण्यात आले. तसेच देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात फ्रुट विभागात 3, टोमॅटो विभागात 125, कांदा-बटाटा विभागात 7 पक्के बांधकाम असलेले गाळे आहेत. वाढीव गाळे 16.5, अन्नधान्य विभागात 6, फ्रुट विभागात 2 पक्के बांधकाम असलेले गाळे बांधण्यात आल्याची माहिती प्रशासक व बाजार समितीच्या सचिवांनी 13 जुलै 2022 रोजी पाटील यांना दिली आहे.

- Advertisement -

काय म्हटलय नोटीसमध्ये ?

अनाधिकृत बांधकामामुळे या जागेचा रेखांकन, बांधकाम नकाशे मंजुरीस कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. भविष्यातील कायदेशीर अडी-अडचणी टाळण्यासाठी व बांधकाम नकाशे मंजुरीसाठी विनापरवाना बांधलेला अनधिकृत गाळा स्वखर्चाने काढून घेण्यासाठी 25 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात येत असल्याची सूचना बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -