घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-बेंगळुरू दीड तासात

नाशिक-बेंगळुरू दीड तासात

Subscribe

१० मे पासून विमानसेवा; आयटी क्षेत्राला मिळणार बुस्ट

नाशिकहून उडाण योजनेंतर्गत दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद विमानसेवेनंतर १० मे पासून बेंंगळुरू विमानसेवा सुरू होणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या सेवेमुळे नाशिकच्या आयटी क्षेत्राला बुस्ट मिळेल, अशी आशा आहे.

उडाण योजनेंतर्गत देशातील प्रमुख बारा शहरांशी नाशिक शहर जोडले जाणार आहे. यात भोपाळ, गोवा, बेंगळुरू, गाझियाबाद हिंदण आदींसह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी विमानसेवा दिली जाणार आहे. सध्या ओझर विमानतळाहून नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवांना प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. सध्या अहमदाबाद आणि हैदराबादसाठी आठवड्यातून तीन दिवस सेवा दिली जात आहे. ही सेवा आठवडाभर मिळावी, अशी उद्योजकांची मागणी आहे. सध्या जेट कंपनीच्या सेवेत बदल करण्यात आला आहे. भोपाळ, गोवा, बेंगळुरू, गाझियाबाद या शहरांसाठीच्या सेवा उन्हाळ्यात सुरू होतील, अशी अपेक्षा होती. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात १ एप्रिल ते २६ ऑक्टोबर या काळातील सेवांचा समावेश आहे. इंडिगो कंपनीची नाशिक ते बंगळुरू ही सेवा येत्या १० मे पासून सुरू होणार आहे, असे हवाई वाहतूक महासंचालनालयाने जाहीर केले आहे. या सेवेमुळे दक्षिणेतील एक महत्वाचे शहर नाशिकशी जोडले जाणार आहे. नाशिक बेंगळुरू प्रवासासाठी सध्या सात तास लागतात या सेवेने आता दीड तासात बेंगळुरूला पोहोचणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

अशी असेल सेवा

ही सेवा आठवडाभर मिळणार आहे. ओझर विमानतळावर सायंकाळी सहाला विमान येईल आणि साडेसहाला ते बेंगळुरूकडे निघेल. या सेवेचा नाशिकला मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -