घरमहाराष्ट्रनाशिकपरीक्षक येती दारा; दिला स्वच्छतेचा नारा

परीक्षक येती दारा; दिला स्वच्छतेचा नारा

Subscribe

महापौर रंजना भानसी यांनी आता शहरात अचानक दौरे करून अस्वच्छतेचा पंचनामा सुरू केला आहे. दिंडोरीरोड तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील दुभाजकातील अस्वच्छतेबाबत त्यांनी घनकचरा प्रकल्प संचालकांची कानउघाडणी केली. त्यानंतर या ठिकाणी साफसफाई करण्यात आली.

स्वच्छ नाशिक सर्वेक्षणाच्या वेळीच जागे होणार्‍या महापालिकेच्या मुखंडांनी पुन्हा एकदा शहर स्वच्छतेचा देखावा सुरु केला आहे. स्वच्छतेच्या स्पर्धेचे परीक्षण सध्या सुरु असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. वास्तविक, स्वच्छतेचे काम नियमीतपणे सुरु ठेवल्यास परीक्षक येतील तेव्हा ऐनवेळी धावपळ करण्याची गरजच भासणार नाही अशी प्रतिक्रीया नाशिककर व्यक्त करीत आहेत.

स्पर्धा तोंडावर येताच स्वच्छतेचा देखावा

स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या दहा शहरात नाशिकला आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नाशिक पहिल्या दहा शहरात आणावी, अशी सूचना केली होती. मात्र प्रशासनासह सत्ताधारी भाजपला अपयश आले. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकमेकांवर खापर फोडत वेळ दवडला. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही ठोस उपाययोजन केल्या नाहीत. मात्र स्पर्धा तोंडावर येताच पुन्हा एकदा स्वच्छतेचा दिखावा सुरु झाला आहे.

- Advertisement -

’दिसेल कचरा, लाव फोन’

महापौर रंजना भानसी यांनी आता शहरात अचानक दौरे करून अस्वच्छतेचा पंचनामा सुरू केला आहे. दिंडोरीरोड तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील दुभाजकातील अस्वच्छतेबाबत त्यांनी घनकचरा प्रकल्प संचालकांची कानउघाडणी केली. त्यानंतर या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. या निमित्ताने महापौरांनी शहरात फिरताना ’दिसेल कचरा, लाव फोन’ अशी मोहीम घेतली आहे. त्याअंतर्गत ते घनकचरा प्रकल्प संचालक डॉ. सचिन हिरे यांच्यासह विभागीय अधिकार्‍यांना दूरध्वनी करीत आहेत. सोमवारी त्यांनी सूचना केल्यानंतर दिंडोरीरोडवरील मेरी कार्यालयाजवळील मुख्य रस्ता साफ करण्यात आला. तसेच येथील दुभाजक व पादचारी मार्गही स्वच्छ करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील कचर्‍याने भरलेली दुभाजक साफ करण्यात आले. हे काम नियमीतपणे होत राहिल्यास स्पर्धेचे बक्षीस तर नाशिकला मिळेलच; शिवाय नाशिककरांचे आरोग्यही अबाधित राहिल अशा भावना शहरातून व्यक्त होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -