घरमहाराष्ट्रनाशिकगॅस दरवाढीचा निषेध ; राष्ट्रवादीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवर्‍यांची भेट

गॅस दरवाढीचा निषेध ; राष्ट्रवादीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवर्‍यांची भेट

Subscribe

नाशिक जिल्हा आणि शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन

दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून गॅस सिंलेडच्या दरात २५ रूपयांनी वाढ झाल्याने महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवर्‍या पाठवत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.नाशिक जिल्हा आणि शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वात भगूर येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढ करून केंद्रसरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला. यावेळी भगूर शहराध्यक्षा प्रेमलता राजगुरू, ज्योती भोर, रूबीना खान, संगिता उमाप, सपना पवार, गायत्री झांजरे, लता आहिरे, दिपाली गायकवाड, मेहरूनिसा खान, आदींसह महिला उपस्थित होत्या. नाशिक शहरातही शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

गेल्या दिड वर्षापासून देशात कोरोना संसर्गामुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले अशा कठिण परिस्थितीत जगणे मुश्किल झाले आहे. मात्र मोदी सरकारला गोरगरिबांशी काही देणे घेणे नसल्याचा आरोप भामरे यांनी केला. यावेळी नाशिक पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधानांना शेणाच्या गोवर्‍यांची भेट पाठविण्यात आली. यावेळी पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, नाशिकरोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे आदिंसह महिला उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -