घरताज्या घडामोडीदिलासादायक! नाशिक जिल्हा होणार कोरोनामुक्त, कोरोनाबाधित युवकाच्या प्रकृतीत सुधारणा

दिलासादायक! नाशिक जिल्हा होणार कोरोनामुक्त, कोरोनाबाधित युवकाच्या प्रकृतीत सुधारणा

Subscribe

लासलगाव येथील 30 वर्षीय युवक 29 मार्च रोजी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी तो युवक कोरोनामुक्त होणार आहे. त्या युवकाची सतर्कता आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या दक्षतेमुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे त्या युवकाच्या संपर्कात आलेले नातलग व नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात स्वतः आलेल्या या युवकाचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट रविवारी (दि.29) पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, तो परदेशवारी किंवा पुणे, मुबंईतून आलेला नाही तर तो बेकरीतील कामगार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य यंत्रणेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली. पोलीस लासलगावात नाकाबंदी करत कठोर उपाययोजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कात आलेल्या नातलग व नागरिक अशा एकूण 19 जणांना डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कोरोनाबाधित युवकावर उपचार करत आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारण होत आहे. ६ एप्रिल व १४ एप्रिल असे दोनवेळा त्याच्या घशाचे नमुने धुळे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ते रिपोर्ट निगेटिव्ह येणार असून तो लवकरच कोरोनामुक्त होणार आहे, असा विश्वास जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

लासलगावच्या कोरोनाबाधित रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार केले जात असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने सातव्या व 14 व्या दिवशी घेत तपासणी केली जाणार आहे. ते रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे.
डॉ. सुरेश जगदाळे जिल्हा शल्यचिकित्सक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -