Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक ढोलचा दणका... ढोलताशा महोत्सवात थिरकले नाशिक

नाशिक ढोलचा दणका… ढोलताशा महोत्सवात थिरकले नाशिक

Subscribe

नाशिक : गगनाशी भिडणारा नाशिक ढोलचा आवाज.. पावसाची संततधार… नाशिककरांचा उदंड प्रतिसाद आणि अमाप उत्साह अशा भारावलेल्या वातावरणात शिवसेना नाशिक ढोलताशा महोत्सव-जल्लोष तरुणाईचा कार्यक्रम रंगला होता. शनिवारी (दि.९) त्र्यंबकरोडवरील ठक्कर्स डोम मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांची नावे रविवारी (दि.९) जाहीर केली जातील.

नाशिकचा डंका जगभर गाजविणार्‍या ‘नाशिक ढोल’चा सन्मान करण्यासाठी शिवसेना नाशिक महानगर आणि ऊर्जा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाठ, प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सई ताह्मणकर, शिवचित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, शिवसेना पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी, हेमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. लयबद्ध ताल व ठेका या वैशिष्ट्यांवर आधारीत हा ढोलताशा उपस्थित सर्वांसाठीच थक्क करुन सोडणारा अनुभव होता. विशेष म्हणजे उपस्थितांमध्ये आबालवृद्धांचा समावेश होता. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

- Advertisement -

सहभागी ढोलताशा पथक

 • विघ्नहरण ढोल पथक
 • ताल रुद्र ढोल-ताशा ध्वज व बरची पथक
 • रामनगरी वाद्यपथक
 • मार्तंड भैरव ढोल-ताशा पथक
 • श्री रामसेना वाद्य पथक, लासलगाव
 • माऊली ढोल पथक
 • शिवताल वाद्य पथक
 • नटनाद ढोल-ताशा पथक
 • आम्ही नाशिककर ढोल-ताशा
 • वरद विनायक ढोल-ताशा पथक
 • कलाक्षेत्र वाद्य पथक
 • शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक
 • नाशिक ढोल-ताशा पथक
 • सिंह गर्जना ढोल-ताशा पथक
 • गुलालवाडी ढोल-ताशा पथक

कार्यक्रमाचे परीक्षक

राजेश गाणेकर – ज्ञानप्रबोधिनी पथक पुणे
सुजित सोमण रमणबाग पथक, पुणे
यशेश मंडलिक, नुभवी वादपथक, पुणे
ललित पवार, शिवगर्जनापथक, पुणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -