Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक नाशिकच्या अभियंत्याचा पुण्यात अपघाती मृत्य

नाशिकच्या अभियंत्याचा पुण्यात अपघाती मृत्य

Related Story

- Advertisement -

इंदिरानगर येथील अभियंत्याचा पुण्याजवळील चाकण-तळेगाव रस्त्यावर सोमवारी (दि.६) इंदुरी गावाजवळील बायपास वळणावर बसच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रेयस संजय गायकर (२८) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रेयस बुलेट (एमएच १५ जीझेड ००२०) वरुन इंदुरीतील बायपास वळणावरुन जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव बस(एमएच १४ सी डब्ल्यू ४०५३)ने जोरदार धडक दिली. त्यात श्रेयसचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. इंदिरानगर येथील रहिवाशी व शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी संजय गायकर यांचे ते चिरंजीव होत.

- Advertisement -