घरमहाराष्ट्रनाशिकसंभाजी राजेंच्या उपोषणात नाशिककर सहकुटुंब होणार सहभागी

संभाजी राजेंच्या उपोषणात नाशिककर सहकुटुंब होणार सहभागी

Subscribe

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले येत्या शनिवार (दि.26) पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणात नाशिकमधील सकल मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्ते सहकुंटुंब सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील समाजबांधवांनी या उपोषणात सहभागी होण्यासाठी बुधवार (दि.23) रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्समध्ये नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होताना समाजबांधवांनी प्रत्येक तालुक्याचे नियोजन करण्याची सूचना गायकर यांनी केली आहे. सोमवारी (दि.21) सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड.शिवाजी सहाणे, गणेश कदम, नगरसेवक उध्दव निमसे, राजू देसले, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, सरपंच परिषदेचे अनिल ढिकले, प्रभाकर रायते, योगेश गांगुर्डे, अशिष हिरे, पुंडलिक मोरे, अमित देशमुख उपस्थित होते. मराठा समाजाच्या सहा प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे हे येत्या शनिवारपासून मुंबईत बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील हजारो समाजबांधव 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -