घरमहाराष्ट्रनाशिक३५ वर्षांनंतर नाशिकला मिळाला रेल्वे प्रकल्प

३५ वर्षांनंतर नाशिकला मिळाला रेल्वे प्रकल्प

Subscribe

तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी १९८३ मध्ये नाशिकरोड येथील सुमारे २५० एकर जागा आरक्षित केलेली होती. मात्र या जागेवर कोणत्याही प्रकल्पाची उभारणी झाली नाही. मात्र आता ३५ वर्षानंतर रेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी १९८३ मध्ये नाशिकरोड येथील सुमारे २५० एकर जागा आरक्षित केलेली होती. मात्र या जागेवर कोणत्याही प्रकल्पाची उभारणी झाली नाही. मात्र आता ३५ वर्षानंतर रेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या कारखान्याचे भूमिपूजन गुरूवारी (दि. १७) केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नाशिकरोड येथील कर्षण मशिन कारखान्याच्या जागेवर हा कारखाना उभारण्यात येणार असून याकरिता अर्थसंकल्पात ५३ कोटी रूपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग, आणि मध्य रेल्वेचे व्यवस्थापक आर.के.शर्मा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाची पाहाणी केली होती. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी या ठिकाणी व्हील रिपेअरिंग कारखाना उभारण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिली. त्यामुळे नाशिकला रेल्वेचा मोठा प्रकल्प या कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. या प्रकल्पाचे १७ जानेवारीस भूमिपूजन करण्यात येणार असून या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे गोडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

जिल्ह्याच्या विकासाला मिळेल चालना

नाशिकमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असताना देखील गेले ३५ वर्षात रेल्वे कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत कोणतेही प्रयत्न झाले नाही. याकरिता पाठपुरावा करून प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या कारखान्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे.– खासदार हेमंत गोडसे

 

Nashik Edition start from 18 January
आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -