नासिक जिमखाना टेनिस स्पर्धा; शांभवी सोनवणे-द्विवीज पाटीलला दुहेरी मुकूट

नासिक जिमखाना आयोजित टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणे हीने अंतिम फेरीत त्रिशा शेट्टीचा ६-०असा सहजरीत्या पराभव केला तर २० वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणे हीने अंतिम फेरीत श्रावणी पंगम हीचा ६-० असा पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला. 

नासिक जिमखाना आयोजित टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणे हीने अंतिम फेरीत त्रिशा शेट्टीचा ६-०असा सहजरीत्या पराभव केला तर २० वर्षाखालील मुलींच्या गटात शांभवी सोनवणे हीने अंतिम फेरीत श्रावणी पंगम हीचा ६-० असा पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात द्विविज पाटील याने अंतिम फेरीत प्रत्युष देवरे याचा ६-३ पराभव केला तर  २० वर्षाखालील मुलांच्या गटात द्विविजने अंतिम फेरीत साहिल शेवाळे याचा ६ -१ असा पराभव करून दुहेरी मुकुट संपादन केला.
१२ वर्षाखालील मुलींच्या गटात राघवी पाटील हीने अंतिम फेरीत अक्षदा कनोजिया हीचा ६-० असा  सहज पराभव करून अजिंक्यपद मिळविले तर १२ वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन सोनवणे याने अंतिम फेरीत वेदांत साडेकर याचा  ६-३  असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्रजी छाजेड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेळामध्ये हार आणि जीत ही असतेच. त्यामुळे जिंकणा-या खेळाडूने विजयानन्तर अत्यंत नम्रतेने विजयाचा आनंद साजरा केला पाहिजे तसेच पराभवाला सामोरे जाणाऱ्या खेळाडूंनी नाउमेद न होता पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करून विजयी होण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. याप्रसंगी नरेंद्रजी  छाजेड यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे चिटणीस राधेश्याम मुंदडा यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव शेखर भंडारी यांनी केले. याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख पंच मयूर खरोटे यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नितिन मोडक, प्रमोद रानडे, मिलिंद जोशी, झुलकरनैन  जागीरदार, अभीषेक छाजेड, संजय मराठे सह पालक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.