नाशकात हिंदू तरुणीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका व्हायरल, लव्ह जिहादच्या आरोपांनंतर विवाह सोहळा रद्द

nashik hindu girl wedding with muslim boy marriage card angle to love jihad programme cancelled after social media outcry
नाशकात हिंदू तरुणीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका व्हायरल, लव्ह जिहादच्या आरोपांनंतर सोहळा रद्द

नाशिकमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही भिन्न धर्मातील असलेल्या तरुण- तरुणीला लग्न करायचे होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबियांनी मान्यताही दिली होती, मात्र समाजाच्या वाढत्या दबावामुळे हा नियोजित विवाह सोहळा रद्द करावा लागला. लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्याने अनेकांनी याला लव्ह-जिहाद की धर्मरक्षकांचा वाढता दबाव याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. नाशिकमधील बड्या उद्योजकाची कन्या आणि परधर्मीयवर यांच्या रद्द झालेल्या विवाहाची सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सर्व गोष्टी ठरल्या असतानाही मोडला विवाह

मुलीचे वडील प्रसाद आडगावकर हे दागिन्यांचे मोठे व्यावसायिक आहेत. याप्रकरणावर आता त्यांनी एक पत्र प्रसिद्ध करत विवाहाला कथित धर्मरक्षकांनी विरोध केल्याने हा विवाह स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही कुटंबियांच्या सहमतीने आणि उपस्थितीत मुला- मुलीने नाशिकमधील कोर्टात नोंदणी विवाह केला. मात्र हेच लग्न आम्ही १८ जुलै रोजी संपूर्ण रीतीरिवाजानुसार करण्याचा ते प्रयत्न करत होते. यासाठी नाशिकमधील एक मोठे हॉटेलही बुक करण्यात आले होते. या प्रकरणात दोघांवरही कोणती बळजबरी नव्हती. एवढे सर्व होऊन ते आपल्या मुलीच्या बाजूने उभे आहेत. त्यांना तिच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. असेही त्यांनी म्हटले. मात्र हा विवाह सोहळा एक लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा चर्चा सध्या जोर धरत आहेत. याचमुळे हा विवाह सोहळा रद्द झाल्याची चर्चा शहरात सुरु आहेत. या विवाहाबद्दल समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हा विवाह थांबवावा यासाठी अनेक संस्थांनी प्रयत्न केले. समाजमाध्यमांवर या लग्नाची पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या पत्रिकेतील मुलगी हिंदू, तर मुलगा मुस्लिम असल्याने अनेकांनी समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठवली.

दोन्ही कुटुंबांची जुनी ओळख

वधु दिव्यांग असल्याने तिचे वडील आडगावकरं गेली अनेक वर्षे तिच्यासाठी चांगला मुलगा शोधत होते. अलीकडेच तिच्याबरोबर शिकणाऱ्या मित्राशी तिचे संमतीने लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे दोन्ही कुटुंबिय बरीच वर्षे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला होकार होता. त्यानुसार लग्न सोहळ्याची पत्रिका छापण्यात आली. मात्र ही पत्रिका व्हायरल झाल्यानंतर एकचं गोंधळ उडाला. सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल होताच मुलीच्या वडीलांना विवाह रद्द करण्यासंदर्भात धमकीचे फोन, मेसेज येऊ लागले. तर अनेकांनी हा विवाह सोहळा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले.

कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला नाही

या गदरोळानंतरही मुलीच्या वडीलांनी किंवा कुटुंबियांनी पोलिसांत कोणताही तक्रार दाखल केलेली नाही. तसेच मुलीच्या कुटुंबियांकडूनही यावर बोलण्यास कोणीही पुढे आलेले नाही.


Coronavirus : इंग्लंडप्रमाणे भारतालाही ‘मास्क फ्री’ पाहयचेयं, हायकोर्टाने व्यक्त केली आशा