कोरोना लसीकरणात नाशिक जिल्ह्याचा टक्का वाढला

२८ लाख नागरिकांनी पहिला, तर १० लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

Corona Vaccination:

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आकडा ७५ टक्क्यांवर पोहोचलाय. त्यामुळे आता लसीकरणापासून दूर राहिलेल्या नागरिकांवर प्रशासनाला लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.

नाशिकमध्ये आजवर २८ लाख ५१ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय. तर, साडेदहा लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेत. लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी मोठ्या मंदिरांसह बाजार समित्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. याबाबात जिल्हाधिकारी निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली. सरकारच्या पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम सुरू असलं तरीही प्रत्येक व्यक्तीने स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं.