घरमहाराष्ट्रनाशिकप्रभाग समिती निवड : नाशिकरोडला बंडखोरी, तर पंचवटीत मनोमिलन

प्रभाग समिती निवड : नाशिकरोडला बंडखोरी, तर पंचवटीत मनोमिलन

Subscribe

महापालिका प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत काही प्रभागांत चुरस, तर काही प्रभागांत सामंजस्य

नाशिकरोडला बंडखोरी, सेनेचे प्रशांत दिवे यांची निवड

Prashant Dive Nashikनाशिकरोड प्रभाग सभापती पदाच्या निवडीत भाजपच्या डॉ. सीमा ताजने व विशाल संगमनेरे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहील्याने सेनेचे प्रशांत दिवे यांना ११ मते पडल्याने सभापतीपदी निवड झाली. भाजपच्या हांडगे यांना ९ मते पडली, सेना व भाजपचे समान संख्याबळ असतांना भाजपच्या दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीने भाजपला मोठा झटका बसला आहे. राजीव गांधी भवन मधील स्थायी समिती कक्षात सोमवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडली, भाजपच्या दोन नगरसेविका मिराबाई हांडगे व सुमन सातभाई यांचे दोन अर्ज व शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावतीने प्रशांत दिवे यांचा एक अर्ज दाखल होता, सेना व भाजपाचे संख्याबळ समान असल्याने चिठ्ठी काढून निवड होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती, भाजपच्या वतीने दोन अर्ज दाखल होते, पिठासीन अधिकारी मांढरे यांनी निवड प्रक्रिये दरम्यान कोणाला उमेदवारी अर्ज माघारीसाठी वेळ दिला होता. यावेळी भाजपाच्या नगरसेविका सुमन सातभाई यांनी अर्ज माघार घेतली. परंतु नगरसेविका डॉ. सिमा ताजणे आणि माजी सभापती विशाल संगमनेरे हे अनुपस्थित राहीले. यामुळे सेना राष्ट्रवादीचे ११ व भाजपाचे ९ नगरसेवक असे संख्याबळ झाले. यावेळी निडवणुक झाल्यानंतर शिवसेनेचे प्रशांत दिवे यांना ११ मते पडली तर भाजपच्या मिराताई हांडगे यांना ९ मते पडली. पिठासीन अधिकार्‍यांनी प्रशांत दिवे यांना विजयी घोषित केले.

सातपूरला भाजपच्या जोरावर मनसेचा झेंडा

yogesh shevare Nashikसातपूर प्रभाग समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युतीधर्म पाळत मनसेच्या योगेश शेवरे यांच्याकडे कल दर्शविला. त्यामुळे शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी माघार घेतली. परिणामी शेवरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सातपूर प्रभाग समिती पदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. या समितीसाठी मनसेचे योगेश शेवरे आणि शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीस मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून भाजप मनसेला पाठिंबा दिला. संख्याबळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यावर शिवसेनेचे जाधव यांनी माघार घेतली. त्यामुळे या समितीवर मनसेचा झेंडा फडकला.

- Advertisement -

नवीन नाशिकवर शिवसेनेचा झेंडा

Suvarna Matale Nashikनवीन नाशिक प्रभाग सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या छाया देवांग यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले यांची बिनविरोध निवड झाली. नवीन नाशिक प्रभागात शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्याने सभापती पदी शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. मात्र भाजपच्या छाया देवांग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेवेळी भाजपच्या नगरसेविका छाया देवांग यांनी माघार घेतल्याने मटाले यांचा मार्ग मोकळा झाला व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सुवर्णा मटाले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. महापालिकेच्या या पंचवार्षिक काळात नवीन नाशिक प्रभाग सभापती पदासाठी एकाच प्रभागाला दोनवेळा सभापती पदाची संधी मिळण्याची घटना पहिल्यांदाच घडली. यापूर्वी प्रभाग २८ मधून सेनेचे दीपक दातीर यांनी सभापती पद भूषविले होते. तर आता प्रभाग २८ मधून सेनेच्याच सुवर्णा मटाले यांना सभापतीपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकी पूर्वी प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होतील अशी अपेक्षा प्रभागवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

पूर्व प्रभागात भाजपला संधी, डॉ. दीपाली कुलकर्णी यांना संधी

Deepali Kulkarni Nashikनाशिक पूर्व प्रभागात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य अधिक असल्याने विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनातील स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निवडणुका पार पडल्या.

- Advertisement -

पश्चिममध्ये मनसेची काँग्रेसला साथ, वत्सला खैरे यांची निवड

पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्या वैशाली भोसले यांनी भाजपसोबत युती धर्म न पाळल्याने काँग्रेसच्या वत्सला खैरे यांची सभापतीपदी निवड झाली. भोसले यांच्या भूमिकेमुळे भाजपचे नगरसेवक योगेश हिरे यांची सभापतीपदाची संधी हुकली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत वत्सला खैरे आणि योगेश हिरे यांच्यात थेट लढत होती. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजपची सदस्यसंख्या सारखीच होती. त्यामुळे संपूर्ण मदार ही मनसेच्या मतावर होती. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला साथ दिली होती. त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या निवडणुकीतही भाजप मनसेबरोबर होता. त्यामुळे पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे भाजप सोबतच राहिल असा कयास लावला जात होता. मनसेच्या वैशाली भोसले या काँग्रेसच्या खैरे यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. शिवाय यापूर्वी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भोसले यांना महाविकास आघाडीनेच मदत केली होती. त्याची परतफेड करत भोसले यांनी खैरेंकडे कल दर्शविला. अखेर योगेश हिरे यांनी अर्ज माघार घेतली. त्यामुळे खैरे यांची बिनविरोध निवड झाली.

पंचवटीत बंड टळले, भाजपच्या मच्छिंद्र सानप यांना संधी

MACHINDRA SANAP Nashikपक्षातील नाराजांची समजूत घालण्यात यश आल्याने पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मच्छिंद्र सानप यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. पंचवटी प्रभाग समितीवरही भाजपचे वर्चस्व असल्याने विरोधकांनी तलवारी मॅन केल्या होत्या. विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने भाजपचा सभापती होणार हे निश्चित झाले. मात्र ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. ही निवडणूक भाजपचे विद्यमान आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रतिष्ठेची केली होती. या दोघांनीही आपापले उमेदवार पुढे केल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. या निवडणुकीत भाजपचे मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे या तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. सानप गटाला रोखण्यासाठी ही चाल असल्याचे बालले गेले. रुची कुंभारकर किंवा पूनम सोनवणे यापैकी एकाने विरोधकांबरोबर मोट बांधल्यास सानप यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौर्‍यात बाळासाहेब सानप यांच्या घरी झालेल्या स्नेह भोजनादरम्यान, पक्षांतर्गत विरोध शमवण्यास सानप यांना यश आले. ही ‘डिनर डिप्लोमसी’चा उपयोगी पडली. त्यानंतर पंचवटी प्रभाग निवडणुकीच्या वेळी कुंभारकर आणि सोनवणे यांनी माघार घेतली. परिणामी सानप यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -