घरमहाराष्ट्रनाशिकयुनिफाईड डीसीपीआरअंतर्गत राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेची परवानगी

युनिफाईड डीसीपीआरअंतर्गत राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेची परवानगी

Subscribe

ऑनलाईन पध्दतीने विकसन परवानग्या देण्यासाठी शासनाने महाआयटीच्या सहकार्याने संगणकीय प्रणाली केली विकसित

महाराष्ट्र शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसीपीआर) गेल्या वर्षा पासून राज्यभरात लागू केली आहे. या नियमावलीनुसार संपूर्णत:ऑनलाईन पध्दतीने विकसन परवानग्या देण्यासाठी शासनाने महाआयटीच्या सहकार्याने संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रायोगिक तत्वावर एकूण १८ ठिकाणे निश्चित करण्यात आलीत. संपूर्ण महाराष्ट्रातून संगणकीय प्रणालीतून नाशिक महापालिकेने सर्वात पहिली परवानगी आज दिली आहे.

एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली तसेच संगणकीय प्रणाली विकसित केल्यामुळे नागरिकांना तसेच वास्तुविशारद वा अभियंता यांना वारंवार कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासू नये, या दृष्टीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव भूषण गगराणी, संचालक नांगनूरे, सह सचिव तथा संचालक शेंडे, सहसंचालक, प्रतिभा भदाणे, तसेच शासन नियुक्त संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी असलेल्या टीमचे सह संचालक अविनाश पाटील, सहसंचालक (सेवा निवृत्त) प्रकाश भुक्ते, शैलेंद्र बेंडाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभलेे.

- Advertisement -

या प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व प्रथम परवानगी पत्र आयुक्त कैलास जाधव, सहसंचालक, प्रतिभा भदाणे, सहायक संचालक अंकुश सोनकांबळे, नगर नियोजन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वास्तुविशारद अजित कुलकर्णी यांना आज देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -