घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेने रूग्णांचे वाचवले पाच कोटी

नाशिक महापालिकेने रूग्णांचे वाचवले पाच कोटी

Subscribe

खासगी रूग्णालयांमध्ये बिलांच्या ऑडीटसाठी लेखापरिक्षकांमुळे दिलासा

महापालिकेने खासगी रूग्णालयांमध्ये बिलांच्या ऑडीटसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती केली आहे. या लेखापरिक्षकांनी आतापर्यंत एकूण ५ कोटी ५५ लाख ७९ हजार १०९ रुपयांचे बिल कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हाहाकार उडाला. अनेकांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र खासगी रूग्णालयांकडून रूग्णांवर केल्या जाणार्‍या उपचारापोटी अवाजवी बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने रूग्णालयांमध्ये बिलांच्या तपासणीसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती केली. शासनाने उपचारांचे दर ठरवून दिलेले असतांनाही काही रूग्णालयांकडून वाढीव दर आकारण्यात आल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे.

- Advertisement -

नेमण्यात आलेल्या ऑडिटरकडून बिल तपासणीनंतर तफावत आढळून आल्यास ती रक्कम रुग्णाला परत करण्यासंदर्भात संबंधित रुग्णालयांना सूचनाही देण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत मनपा ऑडिटरकडून २४ हजार ७६९ बिलांची तपासणी करण्यात आली असून, या बिलांपोटी ५ कोटी ५५ लाख ७९ हजार १०९ रुपयांची तफावत आढळून आल्याने ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -