घरउत्तर महाराष्ट्रनाशिक महापालिकेचे ‘मिशन विघ्नहर्ता’; गणपती विसर्जनाची जय्यत तयारी

नाशिक महापालिकेचे ‘मिशन विघ्नहर्ता’; गणपती विसर्जनाची जय्यत तयारी

Subscribe

नाशिक : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिकेने मिशन विघ्नहर्ता अंतर्गत विसर्जनासाठी ५६ कृत्रिम तलाव, २७ नैसर्गिक घाट तर ८३ ठिकाणी पीओपी गणेश मूर्ती संकलनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरा गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी लागत असल्याने नदीपात्राची पाण्याची पातळी वाढल्यास महापालिकेला उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे याकरीता प्रशासनाची चांगलीच कसोटी लागणार आहे.

गेल्या दहा दिवसांपासून नाशिककर मोठ्या भक्ती भावाने गणपतीच्या आराधना करत आहेत. उद्या बाप्पाला मनोभावे निरोप दिला जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनासह नाशिक महापालिका प्रशासन सज्ज झाले असून यंदा पीओपी मुर्ती विसर्जनासाठी महापालिकेने कडक नियमावली तयार केली आहे. नदीपात्रात पीओपी मूर्तींचे विसर्जन केल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवांतर्गत मूर्ती विसर्जनासाठी 27 नैसर्गिक आणि 56 कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेच्या मिशन विघ्नहर्ता अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी यात्रे 83 ठिकाणी पीओपीच्या गणेश मूर्ती संकलनाची सुविधा देण्यात आली आहे.

येथे आहेत नैसर्गिक तलाव

  • पूर्व भागात लक्ष्मीनारायण घाट रामदास स्वामी मठ मनपा एसटीपी परिसर आगळ टाकळी
  • सातपूर भागातील गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पुल, मते नर्सरी पूल या ठिकाणी नैसर्गिक विसर्जन करता येणार आहे
  • पंचवटी परिसरात राजमाता मंगल कार्यालय, म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा इत्यादी ठिकाणी
  • पश्चिम भागात यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथला पटांगण, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट आदी ठिकाणी
  • सिडको भागात पिंपळगाव खांब, वालदेवी घाट
  • नाशिकरोड परिसरातील चेहडी गाव नदी किनारा, पंचक गोदावरी नदी, स्वामी जनार्दन पुलालगत, दशक गाव नदी, वालदेवी नदी, देवळाली गाव, विहित गाव ही नैसर्गिक स्थळे आहेत

येथे कृत्रिम तलाव

  • पूर्व भागात लक्ष्मीनारायण घाट रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामी नगर लेन एक बस स्टॉप जवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथनगर चौफुली, डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक, राजसारथी सोसायटी
  • सातपूर भागात शिवाजीनगर सूर्या मर्फी चौक, अशोक नगर पोलीस चौकी, नंदिनी नदी नासर्डी पूल, अंबड लिंक रोड, आयआयटी पूल, सातपूर पाईपलाईन रोड, जॉगिंग ट्रॅक समोर
  • पंचवटी भागात राजमाता मंगल कार्यालय, गोरक्ष नगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर मानूर, कोणार्क नगर, तपोवन, प्रमोद महाजन गार्डन, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी
  • पश्चिम भागात चोपडा लॉन्स पूल मागे, गोदापार्क, चव्हाण कॉलनी, परीची बाग, पंपिंग स्टेशन जवळ फॉरेस्ट नर्सरी, पुलाजवळ बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल, उंटवाडी म्हसोबा मंदिराजवळ, महात्मानगर जल कुंभाजवळ, पंडित कॉलनी पालिका कार्यालयासमोर, शितळादेवी मंदिरासमोर
  • सिडको भागात गोविंदनगर, जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायाम शाळेजवळ जुने सिडको, पवन नगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडियम, मीनाताई ठाकरे शाळा
  • नाशिक रोड परिसरात मनपा शाळा क्रमांक 125 मुक्ती धाम, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी, जय भवानी रोड पालिका क्रीडांगण, चेहेडी पंपिंग नारायण बापू नगर चौक, राजेश्वरी चौक, गाडेकर मळा, केला विद्यालय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -