घरताज्या घडामोडीमहापालिका कर्मचार्‍याचा मुलगा अपघातात ठार

महापालिका कर्मचार्‍याचा मुलगा अपघातात ठार

Subscribe

नुकसान भरपाईसाठी नागरिकांचा रस्ता रोको

सातपूर येथील अंबडलिंक रोडवर बुधवार (दि.१०) रात्री दुचाकी व टेम्पोच्या अपघातात महापालिका सफाई कर्मचार्‍याचा ६ वर्षीय मुलगा ठार झाला. या अपघातात कर्मचार्‍यासह त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. प्रणय रोहित पवार असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्ता रोको करत अपघातास ठेकेदारास जबाबदार धरत कारवाईची मागणी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित पवार पत्नी व मुलासमवेत बुधवारी रात्री आपल्या दुचाकीवरून सातपूर-अंबड लिंक रोडने पाटील पार्क येथून जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अपघातात प्रणय पवार ठार झाला. तर रोहित पवार व पत्नी गंभीर जखमी झाली. या ठिकाणी काही दिवसांपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता वळविण्यात आला आहे
मात्र, ठेकेदाराकडून सूचना फलक न लावण्यात आलेले नाहीत. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. पवार कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी नागरिकांनी गुरुवारी सकाळी अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पपया नर्सरी ते दत्त मंदिर रस्ता अर्धा तास बंद होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -