Loudspeaker: भोंग्यांसाठी ३ मे पर्यंत परवानगी घ्या, अन्यथा कारवाई अटळ – दीपक पाण्डेय

Nashik Police Commissioner deepak pandey letter bomb against revenue system by letter to Director General of Police

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भोंगे लावण्याच्या अनुषंगाने एक आदेश जारी केला आहे. येत्या ३ मे पर्यंत सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे आदेशात त्यांनी म्हटले आहे. आदेशानुसार परवानगी न घेता भोंगा लावल्यास ४ महिने ते १ महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा तसेच कैद अशी शिक्षा होऊ शकते. तसेच हनुमान चालीसा पठण हे कुठे करावे याचीही मर्यादा या आदेशान्वये घालून देण्यात आली आहे. परवानगी घेणाऱ्यांना हनुमान चालीसेचे पठन हे अजानच्या १५ मिनिटे आधी किंवा १५ मिनिटे नंतर अशा पद्धतीने करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१५ च्या कोर्टाच्या आदेशान्वयेच कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा होईल असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. भोंगेप्ररकणी धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी धार्मिक प्रथा परंपरा रीतिरिवाज आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी आदेश काढले आहेत. भोंगेप्ररकणी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीस तुरुंगवास किंवा तडीपार करण्याची तरतूद असल्याचे आदेशात म्हटले आहे. हनुमान चालिसा लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण केल्यास चार महिने तुरुंगवास, थेट तडीपार किंवा सहा महिने प्रतिबंधकात्मक कारवाई अंतर्गत आणखी सहा महिने तुरुंगवास करण्याची तरतूद असल्याचे आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला मशीदीवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे काढले नाहीत तर मशीदीसमोरच हनुमान चालीसा पठण केले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठीच नाशिक पोलीस आयुक्तांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत.