घरताज्या घडामोडीनारायण राणे यांना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश

नारायण राणे यांना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याच्या वक्तव्यामुळे नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात नाशिक पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या गुन्हाची गंभीर दखल घेऊन नाशिक पोलीस आयुक्तांनी पोलीस उप-आयुक्त नेमूण नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

सुधाकर बडगुज यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्यावर १५३, १८९, ५०४, ५०५(२) आणि ५०६ या कलमांतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हातील आरोपी नारायण राणे असून त्यांनी २३ ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील महाड येथील पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल असे विधान केले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणे उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडु यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमले आहे. तसेच त्यांना एक पोलिसांचे पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रतींना द्यावी

तसेच आदेशात पुढे म्हटले आहे की, गुन्ह्यातील आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच Rules Of Procedure And Conduct Of Business चे Rule 222 A प्रमाणे चेअरमन आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकुंडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळवावी. तसेच याशिवाय इंन्टेलीजन्स ब्युरो, भारत सरकार, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबंधीत जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना नारायण राणे यांच्या अटकेची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधानप्रकरणी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -