घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला मिळाले कोरोना लसीचे २ लाख डोस

नाशिकला मिळाले कोरोना लसीचे २ लाख डोस

Subscribe

महापालिकेला मिळणार ७१ हजार डोस; प्रत्येक केंद्रावर २०० लस देण्याची सूचना

लसीकरणासाठी जनतेने पुढे येण्याचं आवाहन केलं जात असताना नाशिकमध्ये मात्र प्रतिसाद असतानाही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना माघारी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्याला २ लाख २५ हजार लसींचे डोस प्राप्त झाल्यानं लसीकरणाला वेग येणार आहे. प्राप्त डोसमध्ये कोविशिल्डचे २ लाख १६ हजार, तर कोवॅक्सिनच्या ९ हजार ९२० डोसचा समावेश आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्ग कमी होत असला तरी, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने लसीकरणबाबत शासनाकडूनही जनजागृती सुरू आहे. त्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत शहरात २७ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेय. त्यातल्या अनेकांचा पहिला, तर काहींना दुसरा डोस देण्यात आलाय. लसीकरणासाठी शहरात १३५, तर ग्रामीण भागात ४०० केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याला २ लाख २५ हजार ९२० लसींचे डोस उपलब्ध झाले असून, यापैकी महापालिकेला ७१ हजार डोस दिले जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर २०० डोस उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -