Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक नाशिक अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यातच, निर्बंध शिथिल नाही

नाशिक अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यातच, निर्बंध शिथिल नाही

ग्रामीण भागातील रूग्णसंख्या ठरतेय डोकेदुखी ः पुढील आठवडयात निर्बंध शिथिलतेबाबत निर्णय घेणार

Related Story

- Advertisement -

शहराचा पॉझिटिव्हीटी रेट जरी कमी असला तरी, ग्रामीण भागात मात्र अधिक आहे. निर्बंध शिथिल केल्यास ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यास संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे वेगवेगळे टप्पे लागू करण्याऐवजी सध्या तरी तिसरया टप्प्यातीलच निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पुढील आठवडयात ग्रामीण भागातील परिस्थितीत सुधारणा झाल्यास निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार करू असेही ते म्हणाले.

नाशिकमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट 5.८३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत 5587 बळी गेला असून मृत्यू दर 1.43 टक्के आहे. खाजगी हॉस्पिटलमधील 522 बळींची संख्या पोर्टलवर अपडेट होणे बाकी आहे. 1.81 हा सरासरी मृत्युदर आहे. हॉस्पिटलमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. म्युकरमायकोसिस 535 रुग्ण असून 206 झाले बरे झाले आहे. शासनाने निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर केले आहेत. नाशिकचा तिसरया टप्प्यात सामावेश करण्यात आला आहे. गत आठवडयाची आकडेवारी बघता शहरी भागात रूग्णसंख्या जरी घटत असली तरी, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे शहरात निर्बंध शिथिल केल्यास ग्रामीण भागातील लोक शहरात येउन संसर्ग वाढीचा धोका संभवतो. त्यामुळे सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठवडयात पुन्हा बैठक घेउन निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेउ असे त्यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

विकेंड लॉकडाउन कायम

नाशिक शहराचा पॉझिटिव्हीटी रेट जरी कमी झाला असला तरी, ग्रामीण भागातील वाढती रूग्णसंख्या विचारात घेता नाशिक तिसरया टप्प्यात कायम ठेवतांनाच शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाउनही कायम राहणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद राहतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -