घरमहाराष्ट्रनाशिक‘मुकणे‘चे पाणी नाशिककरांना मार्चपासून मिळणार

‘मुकणे‘चे पाणी नाशिककरांना मार्चपासून मिळणार

Subscribe

१३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्ध करणारे केंद्र प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विल्होळी येथे सुरू होणार आहे. २०४१ पर्यंत तितक्याच क्षमतेची अन्य दोन जलशुद्धीकरण केंद्रेही कार्यान्वित होणार आहेत. ९० टक्के पाणी आताच्या प्रतिदिन पाणी मागणीनुसार उपलब्ध होईल. ३० लाख लोकसंख्येला २०३१ पर्यंत पाणीपुरवठा होईल. तर, ४० लाख लोकसंख्येला २०४१ पर्यंत पाणीपुरवठा होईल.

नाशिक लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘मुकणे’ जलवाहिनी योजनेचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ नाशिककरांना मार्च महिन्यापासून होऊ शकतो. आयुक्तांनी नुकतीच या प्रकल्पास भेट देऊन कामाची पाहणी केली. शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येचा फुगवटा बघता नाशिककरांची भविष्यात पाण्याची गरज भागवण्यासाठी विशेषत: २०४१ पर्यंतच्या संभाव्य ५० लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी २६० कोटी खर्च येणार आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

‘मुकणे’ जलवाहिनी योजनेतून पाथर्डी, इंदिरानगर, राजीवनगर ते व्दारकापर्यंतचा काही परिसर तसेच सिडको विभागातील काही भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १३७ दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने ४०० दशलक्ष लिटरपर्यंत क्षमतावाढ केली जाणार आहे. ही योजना जुलै २०१८ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र सातत्याने कामात अडचणी येत गेल्या. त्यानंतर डिसेंबर २०१८ पर्यंत काम करण्याची मुदत दिली गेली. मात्र या मुदतीतही काम पूर्ण न झाल्यामुळे आता मार्च २०१९ ची मुदत दिली आहे. वाढीव मुदतीत तरी काम पूर्ण होणार का याची शक्यता तपासण्यासाठी आयुक्तांनी योजनेला प्रत्यक्ष भेट दिली. धरणाजवळील १८ किलोमीटर लांबीची थेट जलवाहिनी आणि येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ही सर्व कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

असे येणार पाणी

मुकणे धरणातील जॅकवेलमधून पाणी १८०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पहिल्या टप्प्यात विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रात येईल. या जलशुद्धीकरण केंद्रातून पाथर्डी परिसरातील चार जलकुंभ भरले जातील. तेथून हे पाणी मुख्यत: सिडको, इंदिरानगरसह द्वारका परिसरातील घोडेबाबा जलकुंभापर्यंत जाईल. १३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्ध करणारे केंद्र प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विल्होळी येथे सुरू होणार आहे. २०४१ पर्यंत तितक्याच क्षमतेची अन्य दोन जलशुद्धीकरण केंद्रेही कार्यान्वित होणार आहेत. ९० टक्के पाणी आताच्या प्रतिदिन पाणी मागणीनुसार उपलब्ध होईल. ३० लाख लोकसंख्येला २०३१ पर्यंत पाणीपुरवठा होईल. तर, ४० लाख लोकसंख्येला २०४१ पर्यंत पाणीपुरवठा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -