घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकरोड कारागृह; कर्मचारी तीन पट कमी तर कैदी तीन पट अधिक !

नाशिकरोड कारागृह; कर्मचारी तीन पट कमी तर कैदी तीन पट अधिक !

Subscribe

नाशिकरोड : येथील कारागृहात क्षमते पेक्षा कैद्यांची संख्या तीन पट अधिक तर कर्मचारी संख्या तीन पट कमी असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. कारागृहातील अधिकारी व कर्मचार्‍यांची रिक्त पदे व कैद्यांची संख्या यामुळे कारागृह प्रशासनावर ताण वाढत असल्याचे समजते. दरम्यान, कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांनी येथील एका कार्यक्रमात कर्मचारी संख्याबळ कमी असल्याचे कबूल केल्याने या गोष्टीला दुजारा मिळाला आहे.

नाशिकरोड कारागृह नेहमीच विविध कारणांनी चर्चेचा विषय बनलेले आहे. काही वर्षांपूर्वी कारागृहातील कैद्यांकडे बेकायदा सुमारे दीडशे मोबाईल मिळून आल्याने मोठा मोबाईल घोटाळा उघडीस आल्याने संपुर्ण यंत्रणा हादरली होती. कारागृहात कैद्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम देण्यात येते. त्याचप्रमाणे कैद्यांनी बनविलेली अनेक दर्जेदार उत्पादने देशभरात प्रसिद्ध आहे. पर्यावरण पूरक गणेश मुर्तीतून गेल्या कित्येक वर्षात लाखो रुपयांचे उत्पादन कारागृहाला झाले आहे.

- Advertisement -

येथील कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता १२०० कैद्यांची असून सध्या कारागृहात सुमारे ३५०० च्या आसपास कैदी असल्याचे समजते. प्रत्येक सहा कैद्यांसाठी १ कारागृह रक्षक असावा असा नियम आहे. असे असताना केवळ दोनशे कर्मचारी आहेत. त्यापैकी बरेच कैदी वैद्यकीय सुट्टी किंवा साप्ताहिक सुट्टीमुळे कमी होतात, उर्वरित कर्मचारी कारागृहात दिवसपाळी व रात्रपाळीत विभागले जातात. त्याचप्रमाणे कारागृह अधिकारी व अनेक पदे रिक्त असून केवळ सहा अधिकारी कार्यरत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -