घरमहाराष्ट्रनाशिकनीट परीक्षेत नाशिकचा सार्थक भट राज्यात प्रथम

नीट परीक्षेत नाशिकचा सार्थक भट राज्यात प्रथम

Subscribe

नाशिकच्या सार्थक भट याने ७२० पैकी ६९५ गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने राष्ट्रीय स्तरावर सातवा क्रमांक पटकावला.

एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय विद्याशाखांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षेत नाशिकच्या सार्थक भट याने ६९५ गुण मिळवत देशात सहावा व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत राजस्थानच्या नलिन खंडेलवालने ७२० पैकी ७०१ गुणांची कमाई करत राष्ट्रीय स्तरावर अव्वल क्रमांक मिळवला आहे.

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट २०१९ परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ५) जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १५ लाख १९ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७ लाख ९७ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये राजस्थानच्या नलिन खंडेलवालने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्लीच्या भाविक बन्सलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. नाशिकच्या सार्थक भट याने ७२० पैकी ६९५ गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने राष्ट्रीय स्तरावर सातवा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना ntaneet.nic.in किंवा nta.ac.in. या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील.

- Advertisement -

आई, वडील डॉक्टर

सार्थक भट याने क्रांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. बारावी विज्ञान शाखेतून ९१ टक्के गुण मिळवून त्याने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. सार्थकचे वडील राघवेंद्र भट, आई चित्रिका भट हे दोघेही डॉक्टर असल्याने सार्थकलादेखील याच क्षेत्रातील करियरची आवड आहे. सार्थकला आकाश इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

सर्जन होण्याचे स्वप्न

मेडिकलचे शिक्षण घेऊन हार्ट सर्जन होण्याचे स्वप्न आहे. बारावी तसेच नीट परीक्षेची तयारी करताना सेल्फ स्टडीवर विशेष लक्ष दिले. दररोज १२ ते १६ तास अभ्यास करून नीट परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. – सार्थक भट, विद्यार्थी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -