घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना हुडहुडी, पारा १३ अंशावर

नाशिककरांना हुडहुडी, पारा १३ अंशावर

Subscribe

थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे, तीन दिवसांत घसरला शहराचा पारा

नाशिक शहर आणि परिसरात आता थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागला आहे. शनिवारी (दि.७) पारा थेट १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. दरम्यान, पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी शहराचा पारा १६.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शनिवार यात आणखी घट होत १३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला. जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बेमोसमी पावसाचा जोर कायम होता. नवरात्रीनंतर पावसाने उघडिप दिल्याने शहरातचा थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे आता उबदार कपडेही बाहेर निघू लगाले आहेत. सकाळच्या सुमारास काही भागात धुके दाटत आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात उबदार कपडे विक्रेत्यांची ठिकठिकाणी दुकाने दिसू लागली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -