घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचे तापमान ४३ अंशांवर; चटका आणखी दोन दिवस

नाशिकचे तापमान ४३ अंशांवर; चटका आणखी दोन दिवस

Subscribe

नाशिक, मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील दोन दिवस हा पारा वाढतच जाणार असून उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नाशिक, मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील दोन दिवस हा पारा वाढतच जाणार असून उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेच्या इगतपुरी केंद्राच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात मंगळवारी २३ एप्रिलला कमाल ३९ तर बुधवारी २४ एप्रिलला ४१, गुरुवारी २५ एप्रिलला ४२, शुक्रवारी २६ एप्रिलला ४३ तर शनिवारी २७ एप्रिलला ४४ अंश सेल्सियस तापमान राहणार आहे. दोन दिवसांत हे तापमान ४२ ते ४४ व सरासरी ४३ अंश सेल्सियस राहील.

सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. बुधवारी २४ एप्रिलच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी २५ एप्रिलला विदर्भात, तर शुक्रवार २६ एप्रिलपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सध्या अंशत: ढगाळ आकाशासह उष्ण व कोरडे हवामान आहे. मागील आठवड्यात सरासरीच्या खाली उतरलेले तापमान पुन्हा सरासरीच्या वर सरकले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे असून, ब्रह्मपुरीपाठोपाठ अकोला, चंद्रपूर वर्धा येथे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक आहे. तर, जळगाव, मालेगाव, बीड, परभणी येथेही तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याने उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

चक्रीवादळाचा दक्षिण भारताला धोका

बंगालच्या उपसागरात गुरुवारी २५ एप्रिलला श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन, मंगळवारपर्यंत ३० एप्रिलला श्रीलंका आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ तमिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, दक्षिण तमिळनाडून ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -