घरमहाराष्ट्रनाशिकसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात नाशिकची बाजी

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात नाशिकची बाजी

Subscribe

'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७' या स्पर्धेत नाशिक जिल्हयाने बाजी मारली आहे. जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामपंचायतीला १० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्यावतीने राबिविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७’ या स्पर्धेत नाशिक जिल्हयाने बाजी मारली आहे. जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामपंचायतीला १० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर नगर जिल्हयातील लोणी आणि पारनेर तालुक्यातील वडनेर बुुु. ग्रामपंचायत अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची घोषणा केली.

अवनखेड ग्रामपंचायतीला १० लाखांचे बक्षिस

या स्पर्धेकरीता विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहदमनगर या पाच जिल्हयातील दहा ग्रामपंचायतींची विभागस्तरीय सपर्धेकरीता निवड करण्यात आली होती. विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने या ग्रामपंचायतींची पाहणी केली. यात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, घर, गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट व्हीलेज, लोकसहभाग आणि सामुहीक स्वयंपुढाकारातुन नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यात येऊन या निकषाच्या आधारे ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात प्रथम क्रमांक नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीने पटकावला. ग्रामपंचायतीला १० लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील लोणी बु., आणि नाशिक येथील चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतींनी व्दितीय क्रमांक पटकावला या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी चार लाख प्रमाणे आठ लाख रूपये विभागून देण्यात येणार आहे. तर नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील वडनेर बु. ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला. या ग्रामपंचायतीला ६ लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेला उपायुक्त प्रविण पुरी, ज्ञानेश्वर खिल्लारे, सहा.आयुक्त प्रतिभा संगमनेरे, राजेश देशमुख उपस्थित होते.

- Advertisement -

विशेष पुरस्कारांचीही घोषणा

या अभियानांतर्गत तीन विशेष पुरस्कार दिले जातात. यात जळगाव जिल्हयातील अंमळनेर तालुक्यातील मेहेरगांव ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्ता आणि सांडपाणी व्यवस्थापन करिता स्व.वसंतराव नाईक पुरस्कार, धुळे येथील शिंदखेडा तालुक्यातील परसमाळ ग्रामपंचायतीला सामाजिक एकता गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर जळगाव जिल्हयातील भुसावळ तालुक्यातील सुसरी ग्रामपंचायतीला कुटुंग कल्याणअंतर्गत स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -