घरमहाराष्ट्रनाशिककोल्हापूर पुरग्रस्तांना नाशिकमधून मदतीचा ओघ..

कोल्हापूर पुरग्रस्तांना नाशिकमधून मदतीचा ओघ..

Subscribe

कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी धाव घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. येत्या दोन दिवसात ही मदत अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्हा भीषण पूरस्थितीशी सामना करीत आहे. शासनाकडून दिल्या जाणार्‍या फूड पाकीटांवर नेत्यांचे फोटो असल्याने विरोधीपक्ष संबंधितांवर तुटून पडला आहे. दुसरीकडे सत्ताधारीही आपल्या कृत्याचे समर्थन करताना व्यस्त आहेत. असे असले तरीही शासकीय मदतीलाही मर्यादा येत असल्याने नाशिकमधील सामाजिक संस्था आणि अनेक सेवाभावी वृत्तीच्या व्यक्ती पूरग्रस्तांना मदतीसाठी तप्तर झाले आहेत.

- Advertisement -

यातील काहींनी आजवर मोठ्या प्रमाणात मदत कोल्हापूर आणि सांगलीकडे पाठवली आहे. यात चिक्की, राजगीर्‍याचे लाडू, बिस्कीटे, चिवडा, वेफर्स आणि नाशवंत नसणारे अन्य पदार्थ, इलेक्ट्रॉल पावडर, लहान मुले व महिलांसाठी कपडे, सॅनेटरी नॅपकीन, औषधे आदींचा समावेश आहे.

मला मिळणारी आर्थिक मदत गरजू पूरग्रस्तांना वर्ग करण्याची विनंती

महापूरामुळे दुतोंडया मारुती समोरील आमच्या जानी वाड्यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनामा तलाठ्यांंनी केला आहे. मात्र आम्हाला मिळणारी शासकीय आर्थिक मदत नम्रपणे नाकारली असून माझ्या ऐवजी गरजू पूरग्रस्तांना मदत वर्ग करण्याची मी लेखी विनंती केली आहे. – देवांग जानी, गोदाप्रेमी

- Advertisement -

माझे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे.

मला मिळणारे विधानसभेचे मानधन (सुमारे सव्वा लाख रुपये) हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे. या निधीचा उपयोग कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना होऊ शकेल. – प्रा. देवयानी फरांदे, आमदार

वैद्यकीय सामुग्रीसह इतर वस्तूंची गाडी सांगलीला रवाना

नीलवसंत मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने खाद्य पदार्थ, पिण्याच्या पाण्याचे पाकीटे, महिला व लहान मुलांसाठी कपडे, सॅनेटरी नॅपकीन, औषधे व अन्य वैद्यकीय सामुग्री गाडीभर मदत सांगलीला पाठविण्यात आली. – डॉ. प्राची पवार, नीलवसंत फाऊंडेशन

पूरग्रस्तांसाठी नव्या साड्या पाठवल्या आहे

कोल्हापूर आणि सांगलीत गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पाऊस पडला असल्याने तेथील रहिवाशांचे कपडे ओले आहेत. अनेकांचे कपडे वाहून गेले आहेत. त्यामुळे आमच्या नाशिक आणि येवला येथील दालनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी नव्या साड्या पाठवल्या आहेत. शिवाय नाशवंत नसलेले खाद्यपदार्थही पाठवले आहेत. – अमोल चव्हाण, संचालक, कलासाई पैठणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -