घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककर गारठले, पारा ७.६ अंशावर

नाशिककर गारठले, पारा ७.६ अंशावर

Subscribe

नाशिक : नाशिकच्या तापमानात घट होऊन पारा दोन अंशांनी घसरला आहे. तर कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडमध्ये आजही पाच अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी नाशिक शहरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. अशातच मंगळवारी पुन्हा पारा खाली गेल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली. नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील चार ते पाच दिवसांपासून हुडहुडीने वेढा घातला आहे. ढगाळ वातावरणाने काढता पाय घेतल्यानंतर आता थंडीचे आगमन झाले असून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली आहे.तर सकाळच्या सुमारास थंड वार्‍यांमुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. सकाळी आठ वाजेला निघणारे नोकरदार वर्गही नऊ वाजेला घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभर स्वेटर आणि रात्री शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत. नाशिकमध्ये सोमवारी 8.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर पारा घसरून 7.6 अंशावर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला सोमवारी यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असताना आजही 5 अंशावर पारा जैसे थे आहे.

- Advertisement -

दरम्यान, थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरी थंडी अनुभवयास येत आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमान वाढले असले तरी कमाल तापमानात मात्र घसरण पाहायला मिळत होती. म्हणजेच सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही असलेल्या शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे, शिवाय शहरासह जिल्ह्याचे तापमान दोन दिवसांपासून चांगलेच घसरले असून बोचर्‍या थंडीचा अनुभव नाशिककरांना मिळत आहे. त्यामुळे सकाळपासून घातलेला स्वेटर दिवसभरही परिधान करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -