घरमहाराष्ट्रनाशिक..अन्यथा नाशिकमध्ये सोमवारपासून पाणीकपात

..अन्यथा नाशिकमध्ये सोमवारपासून पाणीकपात

Subscribe

महापौरांनी घेतली पाणी कपातीची आढावा बैठक, पुढील रविवारी संयुक्त बैठकीत होणार निर्णय

धरण क्षेत्रासह शहरात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणात केवळ ४० दिवस पुरेल एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत पुढील रविवारपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास सोमवारपासून (दि.१९) नाशिकमध्ये एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून पाणी उचलले जाते. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर सतिश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सद्यस्थितीत  गंगापूर धरणात १९०० एमसीएफटी जलसाठा शिल्लक असुन, त्यापैकी ८०० एमसीएफटी मृतसाठा आहे. ३०० एमसीएफटी पाणी रोटेशनसाठी, २०० एमसीएफटी पाणी एमआयडीसी व इतर वापरासाठी द्यावे लागते. हा एकूण १३०० एमसीएफटी साठा वगळता उर्वरित ६०० एमसीएफटी जलसाठा हा नाशिककरांसाठी उपयोगात येणार आहे. दैनंदिन पाण्याचा वापर लक्षात घेता शिल्लक जलसाठा केवळ ४० दिवसच पुरेल एवढाच असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

- Advertisement -

नाशिककरांनो, पाणी जपून वापरा

रविवारपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास सोमवारी (दि. १९) पुन्हा अधिकाऱ्यांसमवेत सर्व गटनेत्यांची आढावा बैठक घेण्यात येईल. त्यात आठवडयातून संपुर्ण एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असा अंदाज बैठकीत व्यक्त करण्यात आला. भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -