घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांनो, पास असेल तरच बाजारपेठेत मिळणार एन्ट्री

नाशिककरांनो, पास असेल तरच बाजारपेठेत मिळणार एन्ट्री

Subscribe

तिसरी लाट रोखण्यासाठी पोलिसांचा मास्टर प्लॅन : निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय, खरेदीसाठी मिळणार तासाभराचा वेळ

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग थोपवण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून, नाशिकमध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी नाशिककरांना मंगळवारपासून (दि.२९) पास घ्यावा लागणार आहे. हा पास मोफत मिळणार असून, पासधारकांनाच बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नाशिक हॉटस्पॉट ठरले. आता कुठे नाशिकमध्ये दुसरी लाट आटोक्यात येत असतांना नविन डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढू लागल्याने राज्य शासनाने सर्व जिल्हयांना सर्तकतेच्या सूचना देतांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. तसेच नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडत चालल्याचे दिसून येते. गेल्या दिड वर्षांपासून अर्थचक्र थंडावल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता कुठे बाजारपेठा सुरळित सुरू झाल्या असल्याने प्रशासनानेही कारवाई काही प्रमाणात शिथिल केली. मात्र दुपारी ४ वाजेनंतरही अनेक दुकाने खुली असल्याचे दिसून येते तर रस्त्यांवरही नागरिकांची मोठया प्रमाणावर वर्दळ दिसून येत आहे. कोरोना संपल्याच्या आर्विभावात नागरिक वावरू लागल्याने तर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यास कोरोनाला थोपवणे अवघड होणार आहे. त्यामुळे ही बेर्पवाई कोरोनाचा प्रार्दुभाव वाढीस कारणीभुत ठरू नये याकरीता नाशिक पोलीसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानूसार आता शहर पोलीस हदिददतील बाजारपेठेत खरेदीसाठी येण्यासाठी पास सक्तीचे केले आहे. जवळ पास नसेल तर बाजारपेठेत येता येणार नाही. हा नियम मोडल्यास नागरिकांकडून दंड आकारला जाणार आहे.यामुळे विनाकारण बाजारपेठेत गर्दी करणार्‍यांना चाप बसेल असे पोलीसांनी सांगितले.

- Advertisement -

खरेदी करण्यासाठी फक्त एक तास

बाजारपेठांसाठी पास लागू करण्याचा निर्णय झाल्यामुळे यानंतर येथील नागरिकांना पास घेऊन फक्त एक तास बाजारपेठेत थांबता येणार आहे. एका तासात खरेदी करुन नागरिकांना बाजारपेठेच्या बाहेर पडावे लागेल. यापेक्षा जास्त वेळ थांबल्याचे आढळल्यास, प्रशासनाकडून दंड आकारला जाणार आहे. सध्या शहरातील मुख्य बाजारपेठा बॅरिकेड्सच्या साहाय्याने सील करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -