घरमहाराष्ट्रनाशिकवाहन रिकव्हरीवालाच निघाला सराईत चोरटा

वाहन रिकव्हरीवालाच निघाला सराईत चोरटा

Subscribe

२० दुचाकी जप्त; गंगापूर पोलिसांची कारवाई

नाशिक:। बँकेतील वाहन रिकव्हरीची नोकरी सोडल्यानंतर एका व्यक्तीने नाशिक जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल २० दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी सापळा रचून सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयित राहुल देविदास मुसळे (वय ४४, रा. त्रिमूर्ती चौक, अंबड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल मुसळे हा एका फायनान्स बँकेत वाहन रिकव्हरीची नोकरी करायचा. त्याची कोरोनाकाळात नोकरी गेल्याने त्याने वाहने चोरण्यास सुरुवात केली.

वाहनचोरीची तक्रार वाहनमालकाने गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. तेंव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सिटी सेंटर मॉल परिसरात येणार असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. पोलीस चौकशीत त्याने २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने काठेगल्ली, वडाळा, सिडको, उपनगर, मनमाड येथून दुचाकी चोरी केल्या होत्या. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गंगापूर, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली या पोलीस ठाणे हद्दीतील चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -