घरताज्या घडामोडीप्रज्ञाशोध परीक्षेत नाशिकचे यश

प्रज्ञाशोध परीक्षेत नाशिकचे यश

Subscribe

अनघा सिंधु विहारचा प्रज्वल जिल्ह्यात प्रथम तर डॉ.काकासाहेब देवधरची आयुषी काटकर द्वितीय

नाशिक : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला आहे. राज्यातील 213 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून नाशिकच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. अनघा सिंधु विहार आणि बालक मंदिर येथील प्रज्वल अनंत पाटेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच डॉ.काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलची आयुषी महेश काटकर हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उज्ज्वल यश संपादन केले.
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.28) जाहीर झाला. गुणानुक्रमे उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये 213 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिला पेपर 150 व दुसरा पेपर 150 गुणांचा असा एकूण 300 गुणांच्या आधारे हा निकाल घोषित झाला. यात नाशिकच्या अनघा सिंधु विहार आणि बालक मंदिर शाळेतील प्रज्वल अनंत पाटेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर डॉ.काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी आयुषी महेश काटकर हिने महाराष्ट्रात 72 वा क्रमांक राखला. डे केअर सेंटर प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी सर्वेश जितेंद्र माळी याने राज्यस्तरावर 141 वा क्रमांक मिळवत जिल्ह्यात तीसरे स्थान राखले. शिशु विहार आणि बालक मंदिर शाळेतील उत्कर्षा विजय कोल्हे हिने राज्यस्तरावर 198 वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. राज्यस्तरावरील परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी देशभरातून चार हजार विद्यार्थी निवडले जाणार आहेत, त्यातून दोन हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -