घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोड रेल्वे स्थानकाला आयएसओ १४००१ मानांकन

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला आयएसओ १४००१ मानांकन

Subscribe

मध्य रेल्वेत पुण्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकाला हे मानांकन मिळाले आहे

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी आयएसओ १४००१ मानांकन मिळाले आहे. मध्य रेल्वेत पुण्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकाला हे मानांकन मिळाले आहे.

मध्य रेल्वेने दोन महिन्यांपूर्वी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला स्वच्छतेचा पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते. रेल्वे स्थानकाची स्वच्छता व फलाट, रेल्वे ट्रॅक, स्टेशन परीसरातील घन कचरा आणि रेल्वे गाड्यांतील पेंट्रीकार मधील जैविक कचरा आदींचे व्यवस्थापन योग्य केल्यामुळे आयएसओ १४००१ मानांकन मिळाले आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून रोज पंचवीस ते तीस हजार प्रवासी प्रवास करतात, चार ट्रॅकवरून ८४ रेल्वे गाड्या, चार फलाट, सरकता जीना, लिफ्ट, आदी सुविधांनी युक्त रेल्वे स्थानकाला बहुमान मिळाला असल्याने नाशिकसाठी मानाची गोष्ट आहे. स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वाणिज्य व्यवस्थापक कुंदन महापात्रा, रेल्वे कर्मचारी व यांचे रेल्वेच्या भुसावळ विभागाचे रेल्वे अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -