घरताज्या घडामोडीराजेंद्र चव्हाण, रोहिणी ढवळे यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार

राजेंद्र चव्हाण, रोहिणी ढवळे यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार

Subscribe

नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यंदाही हे पुरस्कार दिले जाणार असून, नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने बुधवारी (दि.४) पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रत्येकी दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण नाट्यगृह सुरु झाल्यावर केले जाणार आहे.

दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुषसाठी राजेंद्र चव्हाण, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्रीसाठी रोहिणी ढवळे, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शनासाठी प्रा. रवींद्र कदम, नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार लेखनासाठी विवेक गरुड, पुरोहित स्मृती पुरस्कार बालरंगभूमीसाठी धनंजय वाबळे, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारितेसाठी फणींद्र मंडलिक, रावसाहेन अंधारे स्म्रती पुरस्कार नेपथ्यासाठी चंद्रकांत जाडकर, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार प्रकाशयोजनेसाठी विजय रावळ, रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोकवंतासाठी रमाकांत वाघमारे, शाहीर गजाभाऊ बेणी पुरस्कार राजन अग्रवाल यांना जाहीर करण्यात आला. कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या डॉ. संजय धुर्जड, डॉ. मिलिंद पवार यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नाट्य परिषदेतर्फे काही योगदान पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्यात अविराज तायडे, सुभाष दसककर, नितीन पवार, नवीन तांबट यांचा समावेश आहे. दिवंगत रंगकर्मींच्या वारसांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात विवेक पाटणकर, किशोर पाठक व शारदा गायकवाड यांचा समावेश आहे. पुरस्कार निवड समितीत डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शाहू खैरे, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश जाधव, राजेश भुसारे यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -