वंचितांची गरज ओळखून राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशनचे संस्थापक अंबादास खैरे यांच्यावतीने शहरातील फुटपाथवर कडाक्याच्या थंडीत वास्तव्य करणारया गरिबांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिली.
नाशिकमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून थंडीचा तडाखा वाढत असून पारा दिवसेंदिवस घसरत आहे. थंडीचे अजून दोन महिने बाकी असून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची आवश्यकता सर्वाना भासत आहे. रस्त्यावर राहणारे गरीब गरजू लोक रात्रीच्या वेळी थंडीत कुडकुडत असतात. अशा लोकांचा थंडीच्या तडाख्यामुळे बळी जातो. वंचितांची ही गरज ओळखून गरीब व गरजूंना मायेची उब मिळावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ब्लँकेट तसेच उबदार कपडे वाटप करण्यात आले. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे मिळाल्याने यावेळी गरजूंच्या चेहर्यावरून आनंद ओसंडताना दिसून आला. याप्रसंगी संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, राम शिंदे, सागर तांबे, रोहित जाधव, निलेश जाधव, समीर जाधव, आदित्य पाटील, सचिन अहिरे,महेश बालसराफ आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.