घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी कडून शाळांना महापुरूषांच्या प्रतिमा भेट

राष्ट्रवादी कडून शाळांना महापुरूषांच्या प्रतिमा भेट

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबददल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले असतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भुजबळांच्या वक्तव्याचे समर्थन करत महापालिकेच्या शाळांना महापुरूषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. सातपूर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ३३ राजर्षी शाहू महाराज विद्यामंदिर येथे राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शाळांना महापुरूषांच्या प्रतिमा भेट दिल्या.

सरस्वती व महापुरुषांचे फोटो या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यात याविरोधात आंदोलने केली जात असतांना भुजबळांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी सरसावली आहे. सातपूर येथील महापालिकेच्या शाळेला महापुरुषांच्या प्रतिमेचे वाटप केले. शाळा सुरु होताना सरस्वती शारदेचे पूजन होते. त्यासोबत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व्हावे याकरिता महापुरुषांचे फोटो वाटप करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देखील देण्यात आल्या.
यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, निलेश भंदुरे, रामदास मेदगे, विशाल डोखे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, संतोष भुजबळ, सुनिल घुगे, अक्षय पाटील, करण आरोटे, सिद्धांत काळे, संदीप खैरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरस्वती शारदा यांची प्रतिमा न काढता महापुरुषांच्या प्रतिमा शाळेत लावाव्यात एवढी मागणी असताना वाढती महागाई, जनतेचा वाढणारा रोष याला फाटा देण्यासाठी भाजपाकडून निषेध केला जात आहे. सरस्वतीचा फोटो काढा असे वक्तव्य कोठेही करण्यात आलेले नाही केवळ त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे. यापुढे सर्व पालिका शाळांना या प्रतिमा भेट देऊ. : अंबादास खैरे, शहराध्यक्ष, रायुकाँ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -