घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी जळगाव, रावेर लढवणार - दिलीप वळसे-पाटील

राष्ट्रवादी जळगाव, रावेर लढवणार – दिलीप वळसे-पाटील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार परिवर्तनाचा अशी हाक देणारी परिवर्तन यात्रा काढली जात आहे. १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता पहिली सभा चाळीसगाव, पारोळा, जळगाव शहर, १९ ला चोपडा, जामनेर, मलकापूर आदी भागात परिवर्तन यात्रा जाणार आहे.

माजी खूप झाले, आता नावापुढे विद्यमान येऊ द्या, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी पदधिकार्‍यांना लावला. लोकसभा निवडणूकीत दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन त्यांनी केले आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचे पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. जळगाव शहरातील पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अ‍ॅड. वसंत मोरे उपस्थित होते.

इच्छुकांनी आतापासून तयारी सुरू करावी. बैठकीसाठी आलेले अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी खाली बसले होते. ते पाहून यापुढे सर्व तालुकाध्यक्षांनी खुर्चीवर बसावे, असे आदेशही त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निर्धार परिवर्तनाचा अशी हाक देणारी परिवर्तन यात्रा काढली जात आहे. १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता पहिली सभा चाळीसगाव, पारोळा, जळगाव शहर, १९ ला चोपडा, जामनेर, मलकापूर आदी भागात परिवर्तन यात्रा जाणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -