घरमहाराष्ट्रनाशिकमहिला धोरणाची पंचवीशी; राष्ट्रवादीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला धोरणाची पंचवीशी; राष्ट्रवादीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Subscribe

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी स्विकारलेल्या महिला धोरणाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘महिला धोरण – सन्मान कर्तृत्वान महिलांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिला धोरणाचा लाभ घेतलेल्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्याला शेफाली भुजबळ, योगिता हिरे, विजयश्री चुंभळे, आशा तडवी, समिना मेमन यांची प्रमुख उपस्थिती होती. २२ जून १९९४ रोजी शरद पवार यांनी देशातील पहिल्या महिला धोरणाचा पाया रचला होता. या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा घेण्यात आला. महिला धोरण स्विकारुन शरद पवारांनी महिलांना सन्मान मिळवून दिला. त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे, हादेखील या सोहळ्यामागील हेतू असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.

- Advertisement -

यांचा झाला सत्कार

या सोहळ्यात नूतन आहेर, हेमलता मानकर, निधी देवरे, तरन्नुम शेख, रुपश्री पराते, प्रतिभा म्हस्के, डॉ. दीप्ती बढे, डॉ. सुमुखी अथनी, सुषमा गायकवाड, वनश्री चव्हान, मनीषा क्षिरसागर, पियुषा कुरणे आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -