घरताज्या घडामोडी‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून राष्ट्रवादीचे उपराष्ट्रपतींना पत्र

‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून राष्ट्रवादीचे उपराष्ट्रपतींना पत्र

Subscribe

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच पार पडला. यावेळी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केला. मात्र यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा न देण्याबाबत समज दिली. मात्र यामुळे शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असून याविरोधात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जय भवानी.. जय शिवाजी अशा आशयाची पत्रे उपराष्ट्रपतींना पाठविण्यात आली. यावेळी जिपिओ येथील पोस्ट ऑफीसमधील पत्रपेटीत ही पत्रे टाकण्यात आले.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पत्र युध्द रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे. राममंदिराच्या भुमिपूजनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टिकेेनंतर भाजपने त्यांना ‘जय श्री राम’ लिहून पत्रे पाठविण्याची घोषणा केली त्यानंतर राष्ट्रवादीनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा आशयाचे पत्र पाठविण्यात येत आहे. नाशिक येथील पोस्ट ऑफीसमधून ही पत्रे टाकण्यात आली. यावेळी जय भावनी, जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग म्हणाले, छत्रपतींच्या अस्मिता देशभरात मानत असल्याची लाज वाटणारेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेचा आक्षेप घेऊ शकतात. देशाच्या उपराष्ट्रपतींनी केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जाहीर निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी २० लाख जय भवानी, जय शिवाजी या आशयाचे पत्र उपराष्ट्रपतींना पाठविण्याचे ठरले असून नाशिक जिल्ह्यातून १ लाख पत्र पाठविण्यात आली आहे. यावेळी नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, भुषण शिंदे, जयराम शिंदे, अक्षय कहांडळ, संदीप भेरे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, धिरज बच्छाव, बबलू पाटील, प्रशांत लाभडे, विशाल गायधनी, महेश शेळके, लखन बेंडकुळे, समाधान पवार आदी उपस्थित होते.

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -