घरमहाराष्ट्रनाशिकपोलिस भरतीचे नवे नियम हिरावणार नोकरीच्या संधी, ग्रामीण भागात फटका

पोलिस भरतीचे नवे नियम हिरावणार नोकरीच्या संधी, ग्रामीण भागात फटका

Subscribe

नव्याने लादलेले नियम मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पोलिस भरती संदर्भात नव्याने लादल्या जाणाऱ्या नियमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नोकरीची संधी हिरावली जाऊन नोकरीचे प्रमाणही घटणार आहे. त्यामुळे प्रस्तावित भरती ही पूर्वीप्रमाणेच करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नवे नियम मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शासनाने पोलिस भरतीसंदर्भात जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानुसार मेरीट लावून नंतरच उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. तसेच, फिजिकल, ग्राऊंडमधून पुल अप्स, लांब उडीसारख्या बाबींना हद्दपार करण्यात आले आहे. १०० गुणांची ही शारीरिक चाचणी आता केवळ ५० गुणांची होणार असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांवर मोठा अन्याय होणार आहे. ग्रामीण भागातील नोकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचा थेट परिणाम शेतकरी व ग्रामीण व्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने भरती प्रक्रिया राबबावी, या मागणीसाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलच्या वतीने सेलचे शहराध्यक्ष अॅड. सुरेश आव्हाड यांच्या नेत्रृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मागण्यांसंदर्भात जिल्हधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. शासनाने नव्या नियमांचा निर्णय त्वरीत मागे घेऊन पूर्वी प्रमाणे भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

- Advertisement -

या निदर्शनांमध्ये शहराध्यक्ष अॅड. सुरेश आव्हाड, नासीर पठाण, हाजी मोहिय्योद्दीन शेख, बाळासाहेब जाधव, गणेश धोत्रे, अॅड. श्यम तावरे, अॅड. योगेश जगताप, पांडुरंग काकड, प्रमोद मंडलिक, नितीन चव्हाणके, गणेश विश्वकर्मा, रेखा शेलार, भारती चित्ते, शेख निहाल, शशिकांत ओतारी, राजेश जाधव, आशा निकम, कैलास वाघमारे, प्रदीप सिन्हा, गणेश आव्हाड आदी सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -