घरमहाराष्ट्रनाशिकगायक विक्रम हाजरांच्या स्वरांनी निनादला गोदाघाट; वसंत व्याख्यानमालेचे दिमाखात उद्घाटन

गायक विक्रम हाजरांच्या स्वरांनी निनादला गोदाघाट; वसंत व्याख्यानमालेचे दिमाखात उद्घाटन

Subscribe

नाशिक : देना हो तो दीजिए जनम जनम का साथ, श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, माझे माहेर पंढरी,आहे भिवरेच्या तिरी, शब्द के जंगल में तु क्यु फसां है रे, अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, म्राम नारायणं जानकी बल्लभम, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो अशा अनेक संत, महंत आणि महापुरुषांच्या एकापेक्षा एक सरस अशा भक्ती रचना सादर करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक विक्रम हाजरा यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जयघोषात संपूर्ण गोदाकाठ दुमदुमून गेला. त्याचवेळी उपस्थितीत हजारो रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.शताब्दी वर्षाचा शुभारंभप्रसंगी नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला जणू काही दिवाळी साजरी झाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक विक्रम हाजरा यांच्या स्वर साधनेने गोदाकाठावर सांयसमयी जणू पाडवा पहाटच अवतरली होती.

वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाचा सोमवारी (दि.१) सायंकाळी ७ वाजता देवामामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक व संगीतकार विक्रम हाजरा यांच्या भक्ती संध्या या कार्यक्रमाने शानदार शुभारंभ झाला. याप्रसंगी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष तसेच दिवंगत अध्यक्षांचे वारस यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभानंतर विक्रम हाजरा यांचा भक्ती संध्या या कार्यक्रमाने गोदाघाट भक्ती रसाने निनादला. दरम्यान,
कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंत व्याख्यानमालेची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर प्रार्थना गीतात माई लेले श्रवण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनगणमन राष्ट्रगीत सादर केले. तर चांदवडच्या नेमिनाथ जैन हायस्कूलमधील विद्यार्थिंनींनी गर्जा महाराष्ट्र आणि जयोस्तुते या स्फुर्तीगीतांचे नृत्यातून सादरीकरण केले.

- Advertisement -

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार संयोजकांच्या वतीने शताब्दी वर्षाचे आकर्षक असे स्मृतीचिन्ह व तृणधान्य असून बनवलेल्या पदार्थांचे किड्स देऊन करण्यात आले. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, महापालिका उपायुक्त नितीन नेर, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांचा सत्कार गणेश भोर, अ‍ॅड. हेमंत तुपे यांच्या हस्ते करण्यात आला. माई लेले श्रवण विद्यालयाचे प्राचार्य संतोष पाटील, चांदवडच्या नेमीनाथ जैन विद्यालयाच्या प्राचार्य संगीता बाफना, संगीत तज्ज्ञ संजीवनी कुलकर्णी यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष द. रा. दीक्षित यांचे सुपुत्र कुमार दीक्षित तसेच कै. जयप्रकाश छाजेड यांचे ज्येष्ठ सुुपुत्र प्रितिश छाजेड यांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे व्याख्यानमालेच्या श्रोत्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात आर. आर. सुराणा, वैशाली गायधनी, अक्षय बाविस्कर, मानसी शिंदे या श्रोत्यांचे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विक्रम हाजरा यांनी विविध भक्तीगीते सादर केली.त्यांना श्रीराम संपत आणि मानस कुमार यांनी साथसंगत केली. यावेळी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष विजय हाके, उषा तांबे, प्राचार्य संगीता राजेंद्र बाफणा, मनीष सानप, हेमंत देवरे, गणेश भोरे आदी उपस्थित होते. संदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत देवरे यांनी आभार मानले.

- Advertisement -
७० फूट लांबीचे व्यासपीठ

शताब्दी वर्षानिमित्त यशवंत महाराज पटांगणावर व्याख्यानमालेने 70 फूट लांबीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्यावर 40 बाय 12 चा एलईडी स्क्रीन उभारण्यात आला आहे. पटांगणावर आनंद ढाकीफळे यांच्या संकल्पनेतून सजावट करण्यात आली आहे. या व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रारंभी दररोज विविध शाळांचे विद्यार्थी प्रार्थना गीत सादर करणार आहेत. तसेच व्याख्यानमालेत देश-विदेशातील प्रसिद्ध, अभ्यासक, विचारवंत वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर रात्री ८.४५ ते १० वाजेपर्यंत स्थानिक कलावंत गाणी, नृत्य, चित्र, कविता इत्यादी कार्यक्रम सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, व्याख्यान व कार्यक्रमांचे प्रसारण यु ट्यूब, फेसबुकवर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -