घरताज्या घडामोडीनववीच्या विद्यार्थ्यांना निकाल मिळणार ऑनलाईन

नववीच्या विद्यार्थ्यांना निकाल मिळणार ऑनलाईन

Subscribe

प्रथम सत्रातील गुणांच्या आधारे निकालपत्र तयार करण्याचे आदेश

नाशिक : राज्य सरकारने इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द केलेल्या असल्या तरी शिक्षकांना प्रथम सत्राच्या आधारे निकाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघायला मिळणार असून, पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या मोबाईलवर 1 मे रोजी निकालपत्र पाठवले जाणार आहे.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्रात 60 गुणांची चाचणी परीक्षा घेतली जाते. त्याआधारेच प्रथम सत्राचे निकालपत्रही तयार होते. तसेच दुसर्‍या सत्रात औपचारीकता म्हणून 60 गुणांची घटक चाचणी घेतली जाते. मात्र, या परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येत नव्हते. यातून फक्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासून त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत होता. परंतु, दुसर्‍या सत्रातील घटक चाचणीचेही गुण आता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. म्हणजेच प्रथम सत्रातील 60 गुणांची पहिली घटक चाचणी आणि दुसर्‍या सत्रातील 60 गुणांची चाचणी अशी एकूण 120 गुणांची सरासरी काढून निकाल बनविण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या 1 मे रोजी हा निकाल विद्यार्थ्यांना सुपुर्द केला जाणार आहे. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे ऑफलाईन स्वरुपात यंदा निकाल बघायला मिळणार नसून, व्हॉट्सअपवर तो पाठवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना घर बसल्या निकाल बघायला मिळेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षाही रद्द करण्याची वेळ ओढावली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून इयत्ता दहावीचा भुगोल या विषयाचा पेपरही रद्द करत राज्य सरकारने बेस्ट ऑफ फाईव्हच्या आधारे निकाल घोषित करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, इयत्ता नववी व अकरावीचा निकाल हा प्रथम सत्रातील गुणांच्या आधारे तयार केला जाणार आहे.
&.
नापास होण्याची भिती नाहीच!
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात शक्यतो उत्तीर्ण करुन घेतले जाते. काठावर असलेले विद्यार्थी पुन्हा मागे पडायला नको म्हणून त्यांच्या उत्तरपत्रिकांना ‘हातभार’ लावण्यात येतो. त्यामुळे नववीतून दहावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांना नापास होण्याची भिती नसल्याचे दिसून येते. परंतु, अकरावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -