दुहेरी हत्याकांडाने निफाड तालुका हादरला !

खडकमाळेगाव येथे माथेफिरू मुलाने केली आई-वडिलांची हत्या

लासलगाव : दुहेरी हत्याकांडाने मंगळवारी निफाड तालुका हादरला आहे. तालुक्यातील खडक माळेगाव येथे एका माथेफिरु युवकाने आपल्याच आई आणि वडिल यांना मारहाण केल्याने यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक मिळत आहे.

या माथेफिरू युवकाचे नाव दत्तू रामदास सुडके असून कुटुंबातील भांडणातून त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे या घटनेत रामदास आणाजी सुडके आणि त्यांच्या पत्नी सरूबाई रामदास सुडके यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले आहे. पुढील तपास सुरू आहे.